राज्य आट्यापाट्या पुरुष संघाच्या कर्णधारपदी वीर अभिमन्यू
क्रीडा मंडळाचे खेळाडू सर्वेश मेन यांची नियुक्ती अमरावती, 27 नोव्हेंबर (हिं.स.) चेन्नई येथे 26 ते 29
राज्य आट्यापाट्या पुरुष संघाच्या कर्णधारपदी वीर अभिमन्यू


क्रीडा मंडळाचे खेळाडू सर्वेश मेन यांची नियुक्ती

अमरावती, 27 नोव्हेंबर (हिं.स.) चेन्नई येथे 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या खेळाच्या नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ पन्नालालनगरचे खेळाडू सर्वेश मेन यांची निवड करण्यात आली. अमरावती शहरामध्ये सार्वजनिक मैदान कमी होत असून मुलांना खेळ्ण्यासाठी काही दिवसांनी मैदान मिळतील कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या कठीण परिस्थिती मध्ये पन्नालालनगर मैदान जनतेसाठी सार्वजनिक मैदान मनुनच राहावे यासाठी मागील 25 वर्षीपासून जनतेसाठी आपल्या स्वतःजवळचे पैसे खर्च करून सर्व स्तरावर आक्रमक लढा देवून जनतेसाठी मैदान सार्वजनिक ठेवनारे मंडळाचे पदाधिकारी मिलिंद बांबल यांनी खेळाडूंसाठी मैदान खुले करून दिले आहे. वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ पन्नालाल नगर येथील कबड्डी तसेच आट्यापाट्या खेळामधील अनेक खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर खेळले आहे. त्यांनी अमरावती जिल्ह्याचे नाव गौरवाने उंचावले आहे. तसेच नुकतेच आता मंडळाचे आट्यापाट्या खेळाडू सर्वेश मेन यांची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मंडळाचे पदाधिकारी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल ,प्रशिक्षक प्रा.श्रीधर धाकुलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कर्णधार सर्वेश मेन यांचे अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande