खा. संजय सिंह यांच्या कोठडीत 4 डिसेंबरपर्यंत वाढ
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अजूनही अटकेतच नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी
संजय सिंह


दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अजूनही अटकेतच

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज, मंगळवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. परंतु, न्यायालयाने त्यांची कोठडी 4 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

याप्रकरणी न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. आता पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने ईडीला त्याच दिवशी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आपचे खासदार गेल्या 56 दिवसांपासून कोठडीत आहेत. ईडीने त्यांना 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. संजय सिंह 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. त्यांना 24 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांनी त्याची न्यायालयीन कोठडी 4 डिसेंबरपर्यंत वाढवली. तत्पूर्वी, संजय यांना 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिथे त्यांच्या कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande