मुंबई : प्रशिक्षणार्थी अग्निवीर महिलेची आत्महत्या
मुंबई, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय नौदलातील प्रशिक्षणार्थी अग्निवीर महिलेने मुंबईत आत्महत्या केल
संग्रहित


मुंबई, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय नौदलातील प्रशिक्षणार्थी अग्निवीर महिलेने मुंबईत आत्महत्या केली. सदर महिला अग्निवीर केरळची असून ती आयएनएस हमला येथील नौदलाच्या वसतीगृहात वास्तव्याला होती. तिच्या राहत्या खोलीत 27 नोव्हेंबर रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता.

यासंदर्भात पोलिसांनी आज, मंगळवारी या घटनेची माहिती दिली. प्रशिक्षणार्थी अग्निवीर महिला अपर्णा नायर असून ती केरळची रहिवासी असून गेल्या 15 दिवसांपासून प्रशिक्षण घेत होती. महिलेच्या खोलीतून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. आणि ती मालाडच्या मालवणी भागातील आयएनएस हमला येथे 15 दिवस प्रगत प्रशिक्षण घेत होती. वैयक्तिक कारणावरून महिलेने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. तिचे वैयक्तिक नातेसंबंध संपुष्टात आल्याने ती नैराश्यात होती का, हे शोधण्यासाठी पोलीस तिचे कॉल रेकॉर्डही तपासत आहेत.

यासंदर्भात भारतीय नौदलाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मृतक अग्निवीर अपर्णा नायरने बेडशीटचा वापर फाशी घेण्यासाठी केला होता. जे तिच्या रूममेटने पहिले आणि पोलिसांना कळवले. बोरिवली येथे मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी अग्निवीर अपर्णाचे शवविच्छेदन करण्यात आले. अपर्णा ही केरळमधील पथनमथिट्टा येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी होती. यापूर्वी ती ओडिशामध्ये 6 महिने प्रशिक्षण घेत होती. गेल्या महिन्यातच ती मुंबईला आली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande