उत्तराखंड : सर्व 41 कामगारांची सुखरूप सुटका
गेल्या 17 दिवसांपासून अडकले होते बोगद्यात उत्तरकाशी, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तराखंडच्या उत्तरकाश
उत्तराखंड : सर्व 41 कामगारांची सुखरूप सुटका


गेल्या 17 दिवसांपासून अडकले होते बोगद्यात

उत्तरकाशी, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतल्या सिल्कियारा बोगदा अपघातानंतर गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची आज, मंगळवारी सुखरूप सुटका झाली. या कामगारांच्य सुटकेसाठी इतर एजन्सीजसोबतच एनडीआरएफ देखील भगीरथ प्रयत्न करीत होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि आनंदाची बातमी सोमर आली.

उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेय. बचाव पथकांनी बोगद्याच्या वरून खोदकाम आणि उभ्या ड्रिलिंग केले. पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. बोगद्यातून बाहेर पडलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उर्वरित कामगारांनाही एक एक करून बाहेर काढण्यात आले. या कामगारांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्याच्या आत उतरल्या होत्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बाहेर काढलेल्या मजुरांची भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग देखील घटनास्थळी ठाण मांडून होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्यात असलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे नातेवाईकही उपस्थित होते. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे प्राथमिक आरोग्य चेकअप बोगद्यात बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात करण्यात आले.तत्पूर्वी राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एनडीआरएफच्या जवानांनी सुरुवातीला 2 कामगांरांना बोगद्यातून बाहेर काढले आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आले. या कामरांना तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते रुग्णालय तयार ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्या कामगारांची तपासणी सुरू आहे. या ठिकाणापासून मुख्य रुग्णालय 30 किलोमीटर दूर आहे. सुटका झालेल्या कामगारांना तेथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका तयार ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी या कामगारांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले एनडीआरएफ आणि राज्य व केंद्र सरकारच्या सर्व एजन्सीला गडकरींनी धन्यवाद दिले आहेत. यासोबतच अशा घटना भविष्या टाळता याव्यात यासाठी सर्व बोगद्यांचे ऑडिट करण्याची घोषणा देखील गडकरींनी यावेळी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande