पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठ चमू घोषित
अमरावती, 28 नोव्हेंबर (हिं.स.) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दिनांक 14 ते 18
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठ चमू घोषित


अमरावती, 28 नोव्हेंबर (हिं.स.) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दिनांक 14 ते 18 डिसेंबर, 2023 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा प्रशिक्षणवर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 02 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाचा अब्दुल मुफिज व रिजवान शाह, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा सुहास वानखडे, सचिन बिसनदवे व ए. तन्वीर, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचा शेख आयन, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा अनंत सांडिल्य, प्रणव बोरकर, राहुल राय, विक्रम कुमार व मेहुलकुमार सिंह, नेहरू महाविद्यालय, नेर परसोपंतचा रिजवान उल्लाखान, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा अभिजित दाभाडे व संकेत राऊत, एस.पी.एम. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजीचा पियुष जांभुळकर आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा शुभम मुळे यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande