धुळे - गुरे चोरणा-या गाडीचा अपघात, गाय बैल जागीच ठार
धुळे, 3 फेब्रुवारी, (हिं.स.) धुळे शहरातील पारोळा रोडवर गुरांच्या दवाखाना जवळ आज मध्यरात्री एकातवेरा
धुळे - गुरे चोरणा-या गाडीचा अपघात, गाय बैल जागीच ठार


धुळे, 3 फेब्रुवारी, (हिं.स.) धुळे शहरातील पारोळा रोडवर गुरांच्या दवाखाना जवळ आज मध्यरात्री एकातवेरा गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या गाडीत गुरांची वाहतूक केली जात होती. अपघात ग्रस्त कार मधूनतीन गुरे आढळली त्यातील एक गाय,एक बैल ठार झाले आहेत. या वाहनातून कत्तलीसाठी गुरे चोरुन नेली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. चार जण पोलिसांच्या हाती लागले असून एक जण मात्र पळून गेला. याप्रकरणी आझादनगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, आझादनगर पोलिस ठाण्याचे पो नि.प्रमोद पाटील हे पथकासह पेट्रोलिंगकरीत असतांना ३.३० वाजेच्या सुमारास पारोळा रोडवर एक भरधाव तवेरा कार ओव्हरटेक करुन पुढे गेलीआणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पशु वैद्यकिय दवाखान्यासमोर पलटी होत कडेला असलेल्या वीजेच्या डिपीवर आदळली. पो.नि. प्रमोदपाटील आणि पोलिस कर्मचारी यांनी त्वरीत वाहन थांबवून मदतीसाठी आलेअसता उलटलेल्या वाहनातून एकजण बाहेर आला आणि पळून गेला.गाडीत पाहीले असता त्यात चार जण आणि गुरे आढळली. लोकांच्या मदतीने सदर अपघातग्रस्त वाहनसरळ उभे केले. एम.एच. ०४-डीएन- ३७४१ या क्रमांकाच्या कारमधून चालक रशीद शफीक शेख(वय ४०) रा. अंबिका नगर,चाळीसगाव रोड धुळे, मोहम्मदसलीम शब्बीर अहमद वय ३०,रा.शंभर फुटी रोड, जामचा मळा,सैय्यद रसुल सैय्यद सत्तार रा.वडजाईरोड, काझी प्लाट, शशिकांतसदाशिव मोरे रा.दंडेवालाबाबा नगर,मोहाडी हे पोलिसांच्या हाती लागले.तर पोलिसांचा पाहून पळालेलअफजल उर्फ डल्ल्या, वय ३०, राअंबिका नगर याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासर्वांनी बेकायदेशीरपणेकत्तलीसाठी गोवंश गुरे वाहनातू कोंबूनघेवून जातांना अवघात करुन गुरांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याने त्यांच्यावर भादवि कलम ४२९,२७९, ३३६, ३३७, ३३८, ३७९सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande