अमरावती - अवैधरित्या वृषाची वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त
अमरावती, 4 फेब्रुवारी, (हिं.स.) तिवसा तालुक्यातील शिरजगाव ते मोझरी मार्गावर वृषाची कत्तल करून अवैधरि
अमरावती - अवैधरित्या वृषाची वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त


अमरावती, 4 फेब्रुवारी, (हिं.स.) तिवसा तालुक्यातील शिरजगाव ते मोझरी मार्गावर वृषाची कत्तल करून अवैधरित्या वाहतूक करत असताना एका ट्रॅक्टरवर तिवसा वनविभागाने गस्ती दरम्यान जप्तीची कारवाई केली आहे.

तिवसा व मोर्शी वन परिक्षेत्राचा परिसर हा मोठ्या जंगलाने व्यापला असून तिवसा वनविभागाकडून या भागात गस्त घालून वृषासह वन्यजीव प्राण्यांची निगा राखण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जातात. मात्र तालुक्यात काही ठिकाणी आजही बेकायदेशीरपणे वृषाची कत्तल करून विक्रीसाठी वाहतूक केली जाते. याच अनुषंगाने तालुक्यातील शिरजगाव ते मोझरी मार्गावर गस्ती दरम्यान 181 क्रमांकाचा ट्रॅक्टर हा मोठे वृषाची वाहतूक करत असताना आढळून आला. चौकशी अंती वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता ही वाहतूक केल्याचे दिसून येताच तिवसा वनविभागाने ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल व वनरक्षक यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande