पुणे, 4 फेब्रुवारी (हिं.स.) जावा ४२ आणि येझदी रोडस्टर रेंजमध्ये गेल्या आठवड्यात नवीन आकर्षक रंगांची भर घातल्यामुळे निर्माण झालेला उत्साह पुढे नेत जावा येझदी मोटरसायकलने त्यांच्या येझदी पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन आकर्षक रंगांची भर घालत असल्याची घोषणा केली आहे. येझदी अॅडव्हेंचर आणि स्क्रॅम्बलर जोडी आता त्यांची आकांक्षा आणि मौजमजेची भावना आणखी चेतवत दोन नवीन रंगांनी तयार होत आहे.
येझदी अॅडव्हेंचर आता 'व्हाइटआउट' मध्ये देखील उपलब्ध असेल. बर्फाळ भूभागाने प्रेरित असा हा रंग असून तिथे ही मोटरसायकल अगदी तिथली रुळलेली वाटते. येझदी स्क्रॅम्बलर 'बोल्ड ब्लॅक' आपल्या रंगामुळे रात्रीची परिपूर्ण साथीदार बनते. हे दोन्ही रंग स्पेक्ट्रमच्या विरुद्ध टोकांवरचे असले तरी या मोटारसायकलीची बांधणी एकाच प्रकारे होते आणि भूप्रदेश कोणताही असला तरीही त्यांचे साहस तेच असते.
येझदी लाइनअपमधील नवीन रंग सादर करताना, जावा येझदी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, अॅडव्हेंचर आणि स्क्रॅम्बलर हे मुक्त-उत्साही येझदी व्यक्तिरेखेचे प्रतीक आहेत. दोन्ही उद्दिष्ट धारित मोटरसायकल अॅड्रेनालाईन रषसाठी बनवल्या गेल्या आहेत; मग त्या महामार्गावरच्या लांबच्या राईड्स असो किंवा ट्रेल्सच्या भोवतीचे लहान फेरफटके. नवीन रंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार म्हणून काम करतात आणि त्यांना बाहेर आणखी आकर्षक बनवितात.
कामगिरीसाठी दोन्ही मोटारसायकली विशिष्ट उद्देशाने बनवलेल्या आहेत. अॅडव्हेंचर हे सर्वोत्कृष्ट सर्व-भूप्रदेशांवर चालणारे मशीन आहे, जे एकाच वेळी आरामदायक आणि सक्षम आहे. प्रत्येक राइडला आनंददायी अनुभव म्हणजेच ब्रीझ बनवत त्याचे लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्ट केलेले, DOHC सिंगल-सिलेंडर 334cc चे इंजिन, 30.3PS ची पीक पॉवर आणि 29.84Nm चे पीक टॉर्क देते. ऑफ-रोडर स्टाइलिंग, टेलरमेड सस्पेन्शन सेट-अप आणि आरामदायी एर्गोनॉमिक्समुळे ती कुठेही जाण्यासाठी योग्य मोटरसायकल बनते.
स्क्रॅम्बलर ही भारतातील पहिली खरी निळी स्क्रॅम्बलर आहे जिची बांधणी मजा या फक्त एकाच उद्देशाने करण्यात आली आहे. विशिष्ट स्टाइलिंग असो, मिनिमलिस्ट रीअर सेक्शन असो किंवा अपस्वेप्ट ट्विन एक्झॉस्ट असो, मोटरसायकल तिच्या नावाला जागणारी आहे. पॅकेजमध्ये भर घालत हे असेच 334cc इंजिन आहे जे फ्लॅट टॉर्क कर्व्ह आणि रेव्ह श्रेणीमध्ये पसरलेल्या मिटी टॉर्कसाठी ट्यून केलेले आहे. या इंजिनमधून पीक पॉवर आणि टॉर्क आउटपुट अनुक्रमे 29.1PS आणि 28.2Nm आहे.
दोन्ही मोटारसायकल ए अँड एस क्लचसह स्लिक-शिफ्टिंग सहा-स्पीड ट्रान्समिशनसह येतात. रायडर्सना सुरक्षिततेसह लवचिकता प्रदान करण्यासाठी दोन्ही मोटारसायकलींवर कॉन्टिनेन्टलच्या वर्ग-अग्रणी दुहेरी चॅनेल एबीएस मध्ये तीन एबीएस मोड देखील मिळतात - रोड, रेन आणि ऑफ-रोड (जे मागील एबीएस पूर्णपणे बंद करते). आणखी सुविधा पुरविताना यूएसबी चार्जिंग पॉइंट असलेला हँडलबार आहे तर अॅडव्हेंचर ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील उपलब्ध आहे.
येझदी अॅडव्हेंचर व्हाईटआउटची किंमत एक्स-शोरूम दिल्ली २,१४,९४२ रुपये आहे तर स्क्रॅम्बलर बोल्ड ब्लॅक २,०९,९०० रुपये किमतील उपलब्ध असेल.
हिंदुस्थान समाचार