औरंगाबादेत जी-20 परिषदेअंतर्गत महिलांचे शिष्टमंडळ विविध स्थळांना देणार भेट
औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) शहरात जी-20 परिषदेअंतर्गत विदेशातील महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ 27
औरंगाबादेत जी-20 परिषदेअंतर्गत महिलांचे शिष्टमंडळ विविध स्थळांना देणार भेट


औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) शहरात जी-20 परिषदेअंतर्गत विदेशातील महिला प्रतिनिधींचे शिष्टमंडळ 27 व 28 फेब्रुवारी रोजी येणार आहे. या महिलांचे शिष्टमंडळ ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या बिबीका मकबरा, विद्यापीठ लेणी, सोनेरी महलला भेट देणार असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

औरंगाबाद पालिकेच्या वतीने जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहरात सौदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहे. ही कामे 15 फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जी-20 महिला प्रतिनिधींची ही परिषद भरविण्यात येणार असून 27 व 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विदेशातून येणार्या महिला प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था हॉटेल राम इंटरनॅशनल, हॉटेल विवांतामध्ये करण्यात आली आहे. दोन दिवसी या दौर्याचा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे शहरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी केवळ दोन तासांचा वेळ ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रशासक डॉ. चौधरी म्हणाले की, जी-20 परिषदेअंतर्गत महिला प्रतिनिधीचे शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळाचा दोन दिवशीय सविस्तर कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांचे कार्यक्रम राहतील. शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी दोन तासांचा वेळ ठेवला आहे. त्यात बिबीका मकबरा, विद्यापीठ लेणी आणि सोनेरी महल या स्थळांना भेटी देणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande