औरंगाबादेत अवैध गर्भपाताचा गोरखधंदा उघड, आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल
औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) पैठण तालुक्यातील चित्तेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात अवैध गर्भप
औरंगाबादेत अवैध गर्भपाताचा गोरखधंदा उघड, आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल


औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) पैठण तालुक्यातील चित्तेगावातील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा शनिवारी (4 फेब्रुवारी) उघडकीस आला. 27 वर्षीय विवाहितेचा गर्भपात केल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तिला घाटी रूग्णालात दाखल केल्यामुळे हा प्रकार पोलिसांसमोर उघड झाला. त्यावरून पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, गर्भाला नरक यातना देणारा डॉक्टरच बोगस असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

राज्यात गाजलेल्या मुंडे गर्भपात केंद्राची पुनरावृत्ती औरंगाबाद जिल्ह्यात झाल्याचे या घटनेतून पहायला मिळाले. चित्तेगाव येथील स्त्री रुग्णालयात महिलांचे अवैधरित्या गर्भपात सुरु असल्याचे रॅकेट यानिमित्ताने उघड झाले आहे. एका महिलेची प्रकृती बिघडल्याने शनिवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोग्य विभाग व पोलिसांनी चितेगाव येथील दवाखान्यात छापा मारला असता त्यांना गर्भपात करण्यासाठी लागणारी औषधे इंजेक्शन मिळाले. रविवारी दि.5 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गर्भपात झालेल्या 27 वर्षीय महिलेचा व तिच्या पतीचा जवाब नोंदवला. फरार असलेला डॉ. अमोल जाधव हा डॉक्टरच नसल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून समोर आला. तर त्याची पत्नी सविता उध्दव कळकुंबेकडे होमीओपॅथीची डिग्री असल्याचे बिडकीनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले. गर्भपात झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले आहे. फरार बोगस डॉक्टर दाम्पत्याला अटक केल्यानंतरच गर्भपाताचे रॅकेटची व्याप्ती आणखी वाढू शकते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande