औरंगाबादेत प्राध्यापक पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.) प्राध्यापक पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलि
औरंगाबादेत प्राध्यापक पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी


औरंगाबाद, 5 फेब्रुवारी (हिं.स.)

प्राध्यापक पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी पतीला शनिवारी दि.4 फेब्रुवारी रोजी रात्री बेड्या ठोकल्या. दीपक राजाराम नागलोत (32, रा. गजानन कॉलनी, गारखेडा) असे आरोपी पतीनचे नाव आहे. त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी रविवारी दिले.

या प्रकरणात मयत वर्षा नागलोत (28) हिचे वडील शांतीलाल शिवलाल जारवाल (50, रा. जमानवाडी ता. वैजापुर) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, वर्षा ही इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. तत्पूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकत असतांना दीपक यांच्याशी मैत्री जुळली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वर्षाने आपल्या वडिलांच्या परवानगीने दीपक याच्याशी विवाह केला. वर्षा व दीपक यांना 8 वर्षाचा मुलगा सत्यम आहे. आरोपींनी वर्षाच्या वडिलांना वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादीने रोख व ऑनलाइन स्वरुपात 12 लाख 60 हजार रुपये आरोपींना दिले. मात्र मागील काही दिवसांपासून वर्षा व सासरच्या मंडळी यांच्यात नेहमी वाद होत होते. नेहमी होणार्या वादातून वर्षाने 4 फेब्रुवारी रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी दिपक नागलोत याला रविवारी न्यायालयात हजर केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande