हिंगोली : शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच कवी संमेलनाचे आयोजन
हिंगोली, 5 फेब्रुवारी (हिं.स.) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्या
हिंगोली : शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच कवी संमेलनाचे आयोजन


हिंगोली, 5 फेब्रुवारी (हिं.स.) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच कवी संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. संमेलन समन्वयक म्हणून विजय गुंडेकर यांची निवड करण्यात आली.

दि.17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत कवी संमेलन घेण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, अँड. सचिव विलास नवघरे, कार्याध्यक्ष शिवशंकर घुगे, समिती मार्गदर्शक अँड.मनोज आखरे, कल्याण देशमुख, कोषाध्यक्ष पवन जाधव, ज्येष्ठ साहित्यिक कलानंद जाधव, कवयित्री सिंधुताई दहिफळे, अँड. जया करडेकर देशमुख, कवी दिलीप धामणे, बालाजी शेळके, विजय गुंडेकर, मेटकर, पल्लवी अटल, यांची उपस्थिती होती.

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अंतर्गत कवी संमेलन समिती गठित करण्यात आली. या समितीच्या समन्वयक पदी कवी विजय गुंडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दि.17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पहिल्यांदाच शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनात 30 निमंत्रित कवींना बोलवण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande