मैत्री पाइपलाइनचे भारत-बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तरित्या आभासी पद्धतीने उद्घाटन
नवी दिल्ली, 16 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 18 मार्
मैत्री पाइपलाइनचे भारत-बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तरित्या आभासी पद्धतीने उद्घाटन


नवी दिल्ली, 16 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 18 मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन करतील.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील ऊर्जा क्षेत्रातील सीमारेषा छेदणारी ही पहिली पाइपलाइन आहे, ज्याचा अंदाजे खर्च 377 कोटी रुपये आहे. ज्यापैकी बांगलादेशने बांधलेल्या पाइपलाइनचा भाग अंदाजे खर्च 285 कोटी रुपये इतका होणे अपेक्षित आहे.हा खर्च भारत सरकारने अनुदान सहाय्य अंतर्गत करण्याचे ठरवले आहे.

या पाईपलाईनची वार्षिक 1 दशलक्ष मेट्रिक टन हाय-स्पीड डिझेल (HSD) वाहतूक करण्याची क्षमता आहे. या पाईपलाईनच्या सहाय्याने सुरुवातीला उत्तर बांगलादेशातील सात जिल्ह्यांना हाय स्पीड डिझेलचा पुरवठा केला जाईल.

भारत-बांग्लादेश मैत्री पाईपलाईनच्या कार्यामुळे भारतातून बांगलादेशात हाय-स्पीड डिझेलची वाहतूक करण्यासाठी एक टिकाऊ, विश्वासार्ह, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल अशी व्यवस्था निर्माण होईल आणि दोन्ही देशांमधील ऊर्जा सुरक्षितता क्षेत्रातले सहकार्य आणखी वाढेल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande