चांदवड पंचायत समितीच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक
नाशिक, 17 मार्च (हि.स.) : नाशिक जिल्ह्यामध्ये लाच खोरी थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी जिल्ह्यातील
चांदवड पंचायत समितीच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक


नाशिक, 17 मार्च (हि.स.) : नाशिक जिल्ह्यामध्ये लाच खोरी थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी जिल्ह्यातील चांदवड पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंग हाथ अटक केली आहे.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी सांगितले की,तक्रारदाराच्या वडिलांनी चांदवड पंचायत समितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी नारायण शिंदे यांनी केली होती.तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. काल 4 हजार रुपये स्वीकारताना शिंदे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, निरीक्षक अनिल बागूल, पोलीस नाईक राजेश गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande