भंडारा १८ मार्च ( हिं.स.) : अट्टल घरफोड़ीच्या आरोपीला भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्याच्या गोबरवाही पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. संदीप खेमचंद्र टेंभरे वय 23 वर्ष राहणार मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध जिल्ह्यात 14 चोरिच्या गुन्हाची नोंद आहे.
गोबरवाही पोलीस ठाण्याअंतर्गत 26 नोव्हेंबर 2022 रोजी दिवाळीला ओंकार डहरवाल यांच्या घरून आरोपीने 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप आणि 10 हजार रोख घेऊन फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला असता अडीच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आरोपी संदीप खेमचंद टेंभरे, वय 23 वर्षे, गाव टुंडा जि. सिवनी, याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 4 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार