रत्नागिरीत रविवारी महिलांच्या सहभागासह बुलेट राइड
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : मोटरसायकल बनवणाऱ्या रॉयल इनफिल्ड कंपनीतर्फे रत्नागिरीत रविवारी (दि.
रत्नागिरीत रविवारी महिलांच्या सहभागासह बुलेट राइड


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : मोटरसायकल बनवणाऱ्या रॉयल इनफिल्ड कंपनीतर्फे रत्नागिरीत रविवारी (दि. १९ मार्च) बुलेट राइड आयोजित करण्यात आली आहे.

जगभरात १२२ वर्षापासून विश्वसनीय आणि अत्याधुनिक क्रूजर बाइक सेगमेंटमध्ये रॉयल इनफिल्ड कंपनी मोटरसायकल तयार करते. ती भारतातील सर्वांत मोठी आणि लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी ऑन रोड तसेच ऑफ रोड अशा सर्वोत्तम मॉडेल्स बनवण्यासाठी आणि चालकांना वेगळा अनुभव देण्यासाठी नेहमी कार्यरत असते. जगभरात विविध प्रकारच्या रायडिंग ऍक्टिव्हिटी करण्यामध्येसुद्धा सतत कार्यरत असते. दुचाकीचालकांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य निर्माण करण्यात मदत करते. त्याच अनुषंगाने कंपनीतर्फे जगभरात विविध प्रकारच्या राइडस आयोजित केल्या जातात.

मुंबई-पुण्यात अशआ मोठ्या राइडसचे आयोजन नेहमीच केले जाते. अशा प्रकारची मेगा बुलेट राइड प्रथमच रत्नागिरीत गेल्या वर्षी विनायका मोटर्सतर्फे आयोजित केलेली होती. आता १९ मार्च रोजी सकाळी बुलेटचा थरार परत रत्नागिरीकरांना अनुभवयास मिळणार आहे. जागतिक महिला दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये वूमन अॅण्ड मेन्स राइडस ऑनच्या स्वरूपात ही बुलेट राइड रत्नागिरीत आयोजित केली आहे.रविवारी सकाळी ९ वाजता विनायका मोटर्स (रॉयल इनफिल्ड बुलेट शोरूम) येथून या राइडची सुरूवात होणार असून आरेवारे मार्गे गणपतीपुळे, मालगुंडपर्यंत जाऊन ही फेरी परत शोरूमपर्यंत येईल. या राइडमध्ये प्रथमच लेडी रायडर्सदेखील सहभागी होणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande