जागतिक भरडधान्य परिषदेनिमित्त को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाच्या अध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : नवी दिल्लीत पुसा येथे पहिली जागतिक भरडधान्य (श्री अन्न ) परिषद भरवल्
जागतिक भरडधान्य परिषदेनिमित्त को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाच्या अध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा


नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : नवी दिल्लीत पुसा येथे पहिली जागतिक भरडधान्य (श्री अन्न ) परिषद भरवल्याबद्दल को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज प्रशंसा केली. अन्नसुरक्षेच्या बाबतीत जगापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानाला तोंड देण्याच्या दृष्टीने ही परिषद खूप उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

गयानाहून पाठवलेल्या व्हिडीओ संदेशात इरफान अली यांनी, संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYOM) म्हणून घोषित केल्याबद्दल आदराप्रित्यर्थ त्यांच्या देशातील दोनशे एकर जमीन फक्त भरड धान्यांच्या उत्पादनासाठी देऊ केली आहे. या प्रकारे भारताने या जादुई धान्याचा प्रसार आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि तंत्र सहाय्य पुरवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

भरड धान्य हा फक्त किफायतशीर आणि पोषक पर्याय आहे असे नाही तर हा धान्य प्रकार हवामान बदलामुळे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम पर्याय आहे. सतरा कॅरिबियन देशांमध्ये भरड धान्यांचे उत्पादन आणि प्रसार यासाठी सर्व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे भरड धान्ये ही कॅरेबियन समाजात सुद्धा लोकप्रिय होतील, असे इरफान अली यांनी म्हटले आहे.

भरड धान्यांचे उत्पादन आणि निर्यात यामध्ये भारत हा जागतिक अव्वल असणारा देश आहे आणि त्यामुळे जागतिक स्तरावर भरड धान्यांचे उत्पादन आणि लोकप्रियता याबाबतीत हा देश प्रमुख भूमिका बजावेल, असेही इरफान अली यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओ संदेशात इथिओपियाचे राष्ट्राध्यक्ष साहिल वर्क झैदे यांनी भरड धान्याचे जागतिक परिषद आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. जागतिक भरडधान्य परिषद जगातील सरकारांना आणि धोरणकर्त्यांना जादुई भरडधान्यांची जाहिरात आणि उत्पादन करण्यासाठी प्रेरित करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

काहीशा सहारन (सहारा खंडातील) देश असणाऱ्या इथिओपियासमोरील अन्नसुरक्षेतील आव्हानेच नव्हे तर संपूर्ण आफ्रिकन खंडातील अन्नसुरक्षा आव्हानांना भरड धान्य हे योग्य आणि प्रदीर्घ उत्तर ठरू शकेल. पहिल्या जागतिक भरडधान्य (श्री अन्न ) परिषदेची कल्पना 2030 च्या शाश्वत विकासाच्या लक्ष्याला आकार देण्यासही मदत करेल असे साहिल वर्क झैदे यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande