भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंध अधिक उंची गाठतील - राष्ट्रपती मुर्मू
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संध्याकाळी नेपाळचे राष्ट्र
president india murmu nepal paudel


नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संध्याकाळी नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.

राम चंद्र पौडेल यांनी नेपाळच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत.

भारत आणि नेपाळमधील अद्वितीय आणि बहुआयामी संबंधांबाबत दोन्ही राष्ट्रपतींनी विचारांचे आदान-प्रदान केले. द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्याच्या उपाययोजनांवर आणि दोन्ही देशांतील लोकांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठीच्या मार्गांवर त्यांनी चर्चा केली.

राष्ट्रपती पौडेल यांच्या मार्गदर्शनाखाली भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंध अधिक उंची गाठतील, असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande