नगर - राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नेक्ट लेवल फिटनेसच्या खेळाडूंचे यश
अहमदनगर, 18 मार्च, (हिं.स.) : वाडिया पार्क येथे जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नेक्ट लेवल फिटनेस च्या खेळाडूंचे यश


अहमदनगर, 18 मार्च, (हिं.स.) : वाडिया पार्क येथे जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॅरा पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये सय्यद अस्मिर यांनी बेंचप्रेस या प्रकारामध्ये १२० किलो वजन उचलून गोल्ड मेडल पटकाविले. तसेच पॅरा अथेलेटीक्स मध्ये थाळी फेक प्रकारामध्ये सिल्व्हर मेडल पटकाविले.त्याचप्रमाणे पुणे येथे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग क्लासिक अजिंक्यपद स्पर्धे मध्ये सुरेश बनसोडे व अभिषेक शेळके यांनी आपापल्या वजनी गटा मध्ये अनुक्रमे गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल पटकवल्याबद्दल सर्व खेळाडूंचा नेक्स्ट लेवल फिटनेस (जिम) चे संचालक ओंकार गुर्रम, प्रशिक्षक विजय कनोजिया व जिमचे सदस्यां तर्फे सत्कार करण्यात आला.सर्व विजयी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande