मध्यप्रदेश : नक्षलग्रस्त भागात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान
अपघातात महिला वैमानिकासह प्रशिक्षकाचा मृत्यू गोंदिया, 18 मार्च (हिं.स.) : मध्यप्रदेशातील बालाघाट ये
नक्षलग्रस्त भागात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान


अपघातात महिला वैमानिकासह प्रशिक्षकाचा मृत्यू

गोंदिया, 18 मार्च (हिं.स.) : मध्यप्रदेशातील बालाघाट येथे शनिवारी प्रशिक्षणार्थी विमान कोसळून झालेल्या अपघातात महिला वैमानिकासह प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघाताला वैमानिकाचे नाव रुखशंका आणि प्रशिक्षकाचे नाव मोहित आहे. गोंदिया एटीसीचे एजीएम कमलेश मेश्राम यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार अपघातग्रस्त प्रशिक्षणार्थी विमान महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी विमान होते. बालाघाट जिल्ह्याच्या सीमेवर ते कोसळले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या किरनापूरच्या कोस्मारा पंचायतीअंतर्गत भाक्कू टोला गावात ही घटना घडली. हा परिसर नक्षलग्रस्त असून भाक्कू टोला हा दाट जंगलाचा परिसर असून जिल्हा मुख्यालयापासून हे ठिकाण सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, ट्रेनर आणि एक महिला ट्रेनी पायलट विमानात होते. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका वैमानिकाचा मृतदेह जळताना दिसत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande