छत्रपती संभाजीनगरात चोवीस तासांत निघाले कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. मागील आठव
छत्रपती संभाजीनगरात चोवीस तासांत निघाले कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. मागील आठवड्यापर्यंत शहरात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंखेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, शनिवारी दि.18 मार्च रोजी तब्बल 17 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 38 वर पोहचली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच छत्रपती संभाजीनगर शहर कोरोनाचा संसर्ग वाढण्यात हिटलिस्टवर आहे. दुसर्या लाटेत तर वाढत्या रुग्णांसाठी शहरातील सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांतील बेड हाऊसफुल होऊन बेडस् कमी पडले होते. तिसरी लाट मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व आवश्यक उपाययोजनांमुळे फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. अलीकडे तर मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा एकही सक्रीय रुग्ण नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन वाढ होताना दिसत आहे. शनिवारी तर मागील चोवीस तासांत तब्बल 17 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर ग्रामीण भागातून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी प्राप्त अहवालावरून एकूण कोरोना चाचण्यांतून पॉझिव्हिटी रेट तब्बल 13.82 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. शनिवारी आढळलेल्या 17 नवीन रुग्णांमुळे शहरात सध्या 38 सक्रीय रुग्ण आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व रुग्ण घरी बसूनच उपचार घेत आहे. दोन रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल होते, त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली, असे पालिकेच्या अहवालात नमूद केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande