छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ भव्य हिंदू जनगर्जना मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज एकवटला आह
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ भव्य हिंदू जनगर्जना मोर्चा


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज एकवटला आहे. याबाबत आज रविवारी दि.19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता क्रांती चौकातून जनगर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, तेलंगणा भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर, सुरेश चव्हाणके आदी सहभागी होणार आहेत.

शहरातील भानुदास चव्हाण सभागृहात मोर्चाच्या आयोजनासाठी एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध धर्माचार्यांसह सकल हिंदु समाज प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाने महाराष्ट्रातील आपले शहर असले पाहिजे. सर्व महाराष्ट्रातील आणि जनतेची इच्छा होती. मात्र, काही लोक त्याला धार्मिक रंग देत मुद्दाम विरोध करत आहेत म्हणून सकल हिंदू समाजातर्फे काढल्या जाणार्या या मोर्चात सहभागी होणार असल्याची भावना विविध वक्त्यांनी या बैठकीत बोलून दाखवली. महानुभव पंथाचे पू. सुदर्शन महाराज कपाटे यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. शीख पंथाचे पू. खडकसिंह यांनीही छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा स्वीकार व्हावा, असे म्हटले. बैठकीचा समारोप संजय बारगजे यांनी केला. रविवारी 19 रोजी सकाळी 10 वाजता क्रांती चौकातून जन गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचा समारोप औरंगपुर्यातील महात्मा फुले चौकात होईल. या मोर्चात लाखोंच्या संख्येने हिंदू सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande