भरडधान्य शाकाहारी पदार्थांच्या वाढत्या मागणीत एक पर्यायी अन्न प्रणाली - नरेंद्रसिंह तोमर
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : संतुलित आहार आणि पोषक वातावरणासाठी सहाय्य्यकारी आणि मानवजातीसाठी निस
भरडधान्य शाकाहारी पदार्थांच्या वाढत्या मागणीत एक पर्यायी अन्न प्रणाली - नरेंद्रसिंह तोमर


नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : संतुलित आहार आणि पोषक वातावरणासाठी सहाय्य्यकारी आणि मानवजातीसाठी निसर्गाची देणगी असलेले भरडधान्य शाकाहारी पदार्थांच्या वाढत्या मागणीच्या काळात एक पर्यायी अन्न प्रणाली प्रदान करते, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नवी दिल्लीत जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेला संबोधित केले. या परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष – 2023 जागतिक उत्पादन वाढवण्याची, कार्यक्षम प्रक्रिया आणि पीक वैविध्यतेचा अधिक चांगला वापर करण्याची संधी देईल आणि भरडधान्याला अन्नाचा एक प्रमुख घटक म्हणून प्रोत्साहन देईल, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे, असे तोमर यांनी सांगितले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हे इतर केंद्रीय मंत्रालये, सर्व राज्य सरकारे आणि इतर हितसंबंधितांच्या सहकार्याने भरडधान्यांचे उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये कार्यरत आहे, असे ते म्हणाले.

आशिया आणि आफ्रिका हे भरडधान्य पिकांचे प्रमुख उत्पादन आणि वापर केंद्रे आहेत, विशेषत: भारत, नायजर, सुदान आणि नायजेरिया हे भरडधान्यांचे प्रमुख उत्पादक आहेत आणि जगातील अन्नाच्या प्रत्येक ताटामध्ये भरडधान्यांना अभिमानाने स्थान मिळेल हे पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे, असे तोमर यांनी सांगितले.

आशिया आणि आफ्रिकेमध्ये भरडधान्य हे पहिले पीक होते, नंतर जगभरातील प्रगत संस्कृतींसाठी एक महत्त्वाचे अन्न स्रोत म्हणून याचा प्रसार झाला.

2023 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गयानाचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अली यांना भेटून गयानाच्या लोकांच्या कल्याणासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करणे ही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बाब ठरली असे यापूर्वी तोमर यांनी सांगितले. तोमर यांनी 8-10 जानेवारी 2023 रोजी इंदूर येथे आयोजित 17 व्या अनिवासी भारतीय दिवस अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. अली यांचे आभार मानले आणि प्रतिष्ठित अनिवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल गयानाच्या राष्ट्रपतींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande