सिंधुदुर्गातील साळगावात ७ लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक
सिंधुदुर्ग, 18 मार्च (हिं.स.) : कुडाळ तालुक्यात साळगाव येथे मुंबई-गोवा हायवे पुलावर पोलिसांनी अवैध ग
छापा टाकून जप्त केलेल्या मुद्देमालासह संशयीत आणि पोलिसांची टीम.


सिंधुदुर्ग, 18 मार्च (हिं.स.) : कुडाळ तालुक्यात साळगाव येथे मुंबई-गोवा हायवे पुलावर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या बाबाजी विजय नाईक, (40, रा. खासकिलवाडा सावंतवाडी) याला शुक्रवारी अटक केली. सुमारे ६,८५,२९०/- रुपये किमतीचा गुटखा व ६,००,०००/- रुपये किमतीची टाटा इंट्रा गाडी असा एकूण १२,८५,२९०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातूनसुमारे ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. कुडाळ तालुक्यातील अनेक परिसरात तंबाखूजन्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande