चला जाणूया ठाणे ग्रामीण पोलीस विभागाचे कामकाज...
राज्य शासनाचे विविध विभाग ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कोणकोणती कामे चालतात, सर्वसाम
चला जाणूया ठाणे ग्रामीण पोलीस विभागाचे कामकाज...


राज्य शासनाचे विविध विभाग ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कोणकोणती कामे चालतात, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कोणाशी संपर्क साधावा, तक्रारींसाठी कुठे संपर्क साधावा आदी माहिती नागरिकांना हवी असते. विविध विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या सेवांची ती माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध विभागांची माहिती देण्यात येत आहे. आज आपण जाणून घेऊ या ठाणे ग्रामीण पोलीस विभागाची माहिती...

प्रश्न :- नागरिकांनी तक्रार कोठे व कशी करावी ?

उत्तर :- नागरिकांनी आपल्या जवळील कोणत्याही पोलीस ठाणे येथे जावून लेखी अथवा तोंडी स्वरुपात तक्रार करु शकतात. सायबर गुन्ह्यांविषयी असणाऱ्या तक्रारीसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे हे पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे येथे कार्यरत आहे.

प्रश्न :- पासपोर्ट / नोकरी / इतर कामासाठी चारित्र पडताळणी कशी होते ?

उत्तर :- पासपोर्ट / नोकरी / इतर कामाकरीता चारित्र पडताळणी सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. आपण केलेल्या अर्जानुसार संबंधित पोलीस स्टेशनमधील गोपनीय अंमलदार हे संपूर्ण चौकशी करुन अहवाल सादर करीत असतात. त्यांचा अहवाल आपण ज्या कामाकरीता अर्ज केला आहे, त्या आस्थापनेला सादर केला जातो.

प्रश्न :- ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल जनतेच्या सेवेकरीता कसे उपलब्ध आहे?

उत्तर :- ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल जनतेच्या सेवे करीता 24X7 उपलब्ध आहे.

डायल – ११२ ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध असून यामध्ये महिला हेल्पलाईन व जेष्ठ नागरिक हेल्पलाईनवरही संपर्क साधता येईल.

सोशल मिडीया - 1. फेसबुक https://www.facebook.com/ThaneRuralPolicePage

२. ट्विटर खाते - @Thane_R_Police

३. वेब साईट - https://thaneruralpolice.gov.in.

प्रश्न :- महिलासंबंधी होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत कोठे व कशी तक्रार करावी ?

उत्तर :- पिडीत महिला आपल्या जवळील कोणत्याही पोलीस ठाणे येथे जाऊन त्यांच्या सोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत लेखी अथवा तोंडी स्वरुपात तक्रार करु शकतात.

महिला त्यांच्या सोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारा बाबत दाखल असलेल्या तक्रारी संदर्भात समुपदेशन करण्यासाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सेल स्थापन आहे.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी पुढील प्रमाणे आहे.

संरक्षण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुरबाड (ग्रामीण), पंचायत समिती कार्यालय, मुरबाड जि. ठाणे (दूरध्वनी क्र.०२५२४-२२३६३२, ई-मेल [email protected])

संरक्षण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, शहापूर (दूरध्वनी क्रमांक ०२५२७-२७३७८७, ई-मेल [email protected]).

संरक्षण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, मुरबाड-2 (ग्रामीण) जि. ठाणे. (दूरध्वनी क्रमांक ०२५२4-२23632 ई-मेल [email protected])

संरक्षण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, भिवंडी (ग्रामीण) व भिवंडी ग्रामीण -2 जि. ठाणे. (दूरध्वनी क्रमांक ०२५२२-२५३६७६ ई-मेल [email protected])

संरक्षण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, डोळखांब (दूरध्वनी क्रमांक - ०२५२७-२३४३०७, ई-मेल [email protected]).

प्रश्न :- अवैध धंधाबाबत तक्रार कोठे व कशी करावी ?

उत्तर :- नागरिक हे अवैध धंद्याबाबत आपल्या जवळील कोणत्याही पोलीस ठाणे येथे जावून लेखी अथवा तोंडी स्वरुपात तक्रार करू शकतात.

प्रश्न :- ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात कोण-कोणते पोलीस ठाणे आहेत ?

उत्तर :- १. गणेशपुरी (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02522261293.)

२. भिवंडी तालुका (ई-मेल [email protected], दूरध्वनी क्रमांक 02522251250).

३. पडघा (ई-मेल [email protected], दूरध्वनी क्रमांक 02522268100).

४. शहापूर (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02527272090).

५. वाशिंद (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02527229900).

६. कसारा (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02527246030).

७. किन्हवली (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 0257232033).

८. मुरबाड (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02524222233).

९. कल्याण तालुका (ईमेल- [email protected] दूरध्वनी क्रमांक 02512381320).

१०. कुळगांव ([email protected] दूरध्वनी क्रमांक 02512690050).

११. टोकावडे (ई-मेल [email protected] दूरध्वनी क्रमांक 02524650750.)

संकलन -

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, ठाणे

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande