गुलाबाचे फुल आणि पेढे वाटत वंदना बस डेपोमध्ये महिला शिवसैनिकांचा जल्लोष
ठाणे, 18 मार्च (हिं.स.) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्
ठाणे


ठाणे, 18 मार्च (हिं.स.) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात राज्यातील महिलांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत प्रवास देण्याची घोषणा केली होती. याच अनुषंगाने शुक्रवार पासून राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ठाण्यातील महिला शिवसैनिकांनी वंदना एस टी डेपो येथे प्रवास करणाऱ्या महिलांचे स्वागत करून गुलाबाचे फुल आणि पेढे भरवून जल्लोष केला. यावेळी शिंदे - फडणवीस सरकारचे उपस्थित महिलांनी आभार मानले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारने धडाधड लोकहितवादी निर्णय घेऊन जनतेला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील तत्कालीन माहविकास आघाडी सरकारने फक्त घोषणा देत गेल्या अडीज वर्षांत जनतेची दिशाभूल केली होती. मात्र हे ९ महिन्याचे सरकार खऱ्या अर्थाने निर्णय घेत जनतेची कामे आणि विविध योजना सर्वसामन्यांपर्यंत पोहचत असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अमलात आणली असल्याने सरकारने घेतलेल्या या निर्णयावर ठाणे जिल्हा महिला आघाडीने देखील स्वागत केले आहे. यावेळी महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष करण्यात आला. तर शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या शहर संघटक मनीषा कोंडुसकर, उपशहर संघटक नम्रता भोसले जाधव, संज्योत दाते विधानसभा संघटिका मालती पाटील, नीता कलोरे त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गुलाबाची पुष्प व पेढे वाटून शिंदे - फडणवीस सरकारचे आभार मानले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande