दिल्लीसह उत्तरभारताला भूकंपाचा हादरा
नवी दिल्लीत 6.6 तीव्रतेचा भूकंप नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : भारतीय नववर्षाच्या पूर्वसंध्येला म
दिल्लीसह उत्तरभारताला भूकंपाचा हादरा


नवी दिल्लीत 6.6 तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : भारतीय नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के 6.6 रिश्टर स्केल इतके होते. सुमारे 10 सेकंद जमीन हादरत राहिल्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान लद्दाखमध्ये देखील 23 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणीस्तानमध्ये होते.

दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. पण आता बसलेले धक्के हे जाणवण्याइतपत तीव्र असल्याची माहिती आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक आपापल्या घरातून बाहेर आले. राभी 10 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंपाचा ध्कका बसला आहे. दिल्लीसह तुर्कमेनीस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान या देशांनाही या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे.या भूकंपाची खोली 156 किमी असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच याचे केंद्र हिंदूकूश पर्वतरांगेमध्ये आहे. त्यामुळेच याचा धक्का अफगाणीस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान या देशांना बसल्याची माहिती आहे. या भूकंपाची 71.09 अशांशावर नोंद करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande