अकोला : प्रकाश तायडे यांची अवकाळी भागाला भेट
अकोला, 21 मार्च(हीं.स.) : जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील दिनांक 18 मार्च रोजी शनिवारी झालेल्या अवकाळी
ph


अकोला, 21 मार्च(हीं.स.) : जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील दिनांक 18 मार्च रोजी शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने पातुर तालुक्यातील 24 पेक्षा जास्त गावांतील पिके क्षतिग्रस्त झाले असून बागायती गहू हरभरा कांद्याचे तसेच उन्हाळी सोयाबीन मुंग भुईमूग ज्वारी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर फळ बागेमध्ये संत्रा लिंबू आंबा चिकू टरबूज खरबूज संत्री याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्याची पाहणी करत बांधावर जावून आज अनेक भागात पाहणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, गजानन बोमटे माजी पंचायत समिती सदस्य तथा अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग ) यांच्यासह पाहणी केली व पिकाचे सर्वे संपल्यानंतर शासनाने त्वरित मदतीची घोषणा करावी. अन्यथा काँग्रेस यासाठी आंदोलन करेल असा इशारा तायडे यांनी दिला. यावेळी संतोष ताजने, बाबू सिंग चव्हाण सह पिंपरर्डोली,चोंडी नवेगाव शेत शिवारातील शेकडो क्षतिग्रस्त शेतकरी उपस्थीत होतें अनेकानी आपली व्यथा प्रकाश तायडे काँग्रेस नेते यांचे कडे मांडली.पाहणी करताना विष्णू ठाकरे सरपंच चोंडी, आत्माराम ठाकरे ग्रा.प सदस्य, संजय ठाकरे पोलीस पाटील चोंडी, श्याम ठाकरे प.स सदस्य ,रामदास मारोडकर ,वैभव ठाकरे, राजाराम बुंदे,सुनील ठाकरे,रामा झ्याटे,राजेश ठाकरे,सचिन ठाकरे,बंटी देशमुख शंकर ठाकरे,शरद ताजने,माणिक राठोड,राजेश ठाकरे,मनोर ठाकरे, सुनील ताजने,नागसेन,शरद ताजने वैभव ठाकरे रवी वायले इत्यादी अनेक क्षतिग्रस्त हवालदिल शेतकरी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande