एण्ड टीव्ही कलाकार सांगतायेत कवितेप्रती त्यांचे प्रेम
मुंबई, 21 मार्च, (हिं.स.) : कवितेतून भाषिक विविधतेला पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक
मनमोहन तिवारी


मुंबई, 21 मार्च, (हिं.स.) : कवितेतून भाषिक विविधतेला पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. एण्ड टीव्ही कलाकार कवितेप्रती त्यांचे प्रेम आणि कविता लिहिण्यास त्यांना प्रेरित करणा-या गोष्टींबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘दूसरी माँ’मधील मोहित डागा (अशोक), मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा) आणि मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी).

अशोकची भूमिका साकारणारे मोहित डागा म्हणाले, ‘‘मला हिंदी साहित्य नेहमीच खूप आवडले आहे. शरद जोशी, हरिशंकर परसाई व प्रेमचंद यांनी लिहिलेल्या कविता मला प्रेरणा देतात आणि जीवनाकडे नवीन दृष्टीकोनातून पाहण्यास मदत करतात. कविता रचणे हा खरंच कोणालाही जडणारा सर्वोत्तम छंद आहे. लहानपणापासून मी किताबी कीडा होतो; मी माझ्या आवडत्या कवींमध्ये इतकं मग्न होऊन जायचो की इतर विषयांकडे कधीच लक्ष दिलं नाही (हसतात). कवितेइतकी संवेदना आणि भावनांची विपुलता इतर कोणत्याही साहित्य प्रकारात नाही, असं मला वाटते. कवितेचा आणखी एक चांगला भाग म्हणजे मला मन:शांती मिळते. आजच्या पिढीला जुन्या क्लासिक्सचा आपल्याइतका आनंद मिळत नसला तरी, मी अजूनही लोकांना, विशेषत: तरुणांना त्यांच्या व्यस्त जीवनातून काही क्षण काढून कविता वाचण्याचे किंवा ऐकण्याचे आवाहन करतो.’’

कटोरी अम्माची भूमिका साकारणा-या हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ‘‘कविता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवास करताना मला कविता पॉडकॉस्ट्स ऐकायला आवडते. वाचनापासून पुन्हा पठण करण्यापर्यंत मला कवितेबाबत सर्वकाही आवडते. विलियम वर्ड्सवर्थ यांची डॅफोडिलिस, रॉबर्ट फ्रॉस्ट यांची माइल्स टू गो बीफोर आय स्लीप, रविंद्रनाथ टागोर यांची द चाइल्ड या माझ्या काही आवडत्या कविता आहेत. माझ्या माध्यमिक शालेय व कॉलेज शिक्षणादरम्यान मी नेहमीच साहित्यामध्ये अव्वल असायचे आणि कवी संमेलनामध्ये भाग घ्यायचे. त्या महत्त्वाकांक्षी व उदयोन्मुख साहित्यिक सिता-यांना भेटून त्यांचाच एक भाग असण्याचा अनुभव प्रेरणादायी होता. कविता व साहित्याप्रती असलेल्या आवडीमधूनच मी रंगभूमीमध्ये सामील झाले. मोकळा वेळ मिळाला की, मी पेन घेऊन कवितांच्या माध्यमातून माझ्या भावना लिहून काढते. मी निसर्ग, महिला, एकांत व सामाजिक समस्यांबाबत लेखन केले आहे. आज उत्साहपूर्ण मीडियाच्या वाढत्या क्षेत्रासह कवींना जगासमोर त्यांच्या शब्दांचा सुरेख खजिना शेअर करण्याचे साधन मिळाले आहे असा माझा विश्वास आहे आणि मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करते. कविता मला काही क्षणांकरिता वास्तविकतेमधून दूर जात कल्पनेच्या विश्वात भरारी घेत असल्याची भावना देते. यामधून मला मन:शांती मिळते. मला शब्दांमध्ये निसर्गाची प्रशंसा करायला आणि त्याचे सौंदर्य व्यापून घ्यायला आवडते.’’

मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ‘‘मला हताश झाल्यासारखे वाटते तेव्हा पुन्हा उत्साहित होण्यासाठी काय केले पाहिजे हे माहित आहे. मी माझ्या घरामध्ये आनंदी कट्टा तयार केला आहे, जेथे मी कविता वाचत वेळ व्यतित करतो आणि सकारात्मकतेच्या विश्वामध्ये भारावून जातो. चहाच्या कपासोबत कविता वाचन, आणि काय सर्व थकवा दूर. माझ्या आवडत्या कवीची निवड करणे काहीसे आव्हानात्मक आहे. मला मिर्झा गालिब, प्रेमचंद, कालिदास, हरिवंशराय बच्चन यांच्या कविता वाचायला व ऐकायला आवडते. मी हजारो वेळा त्यांच्या कविता वाचू व ऐकू शकतो. कविता हा अभिव्यक्तीचा प्रकार आहे, जे प्रेरित करते. मला वाटते की, आपल्या सर्वांमध्ये एक कवी लपलेला आहे. मी दीर्घकाळापासून लेखन करत आहे, जे मला आपल्या संस्कृतीशी संलग्न राहण्यास मदत करते. माझ्या मते, न दिसण्यात येणा-या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करता येऊ शकतात. क्लासिक्सचे माझ्या मनात खास स्थान आहे, जे कधीच जुने होणार नाही. जागतिक कविता दिनानिमित्त मी सर्व वयोगटातील लोकांना कवितेचे वाचन व लेखन करण्याचे आवाहन करतो. यामुळे आपल्याला आपले सर्व तणाव दूर करण्यास मदत होते आणि आपल्याला नवीन आशेचा किरण मिळतो. कवितेचे वाचन व लेखन हा फक्त छंद नसून जीवनाचा मार्ग ठरू शकतो.’’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande