अकोला- अट्टल दुचाकी चोर जेरबंद, चोरीच्या ९ दुचाकी जप्त
अकोला, 21 मार्च(हिं.स.) : अकोला पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. अकोल्यासह आस
ph


अकोला, 21 मार्च(हिं.स.) : अकोला पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. अकोल्यासह आसपासच्या जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ गुन्ह्यातील चोरीच्या नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

अकोला पथकास मिळालेल्या माहितीवरून प्रेम राजेश मीरजकर यास ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने आतापर्यंत एकूण नऊ मोटारसायकली अकोला शहरातून व एक शेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. त्याने या मोटारसायकली शाहरूख खान सलीम खान (32, रा. कब्रस्थान हैदरपुरा, खदान अकोला), सैयद समीर सैयद सलीम 23, रा. राजूनगर अकोट फैल) या दोघांसोबत मिळून चोरी केल्याचे सांगितले. चोरीची मोटारसायकल दाणीश उर्फ राजा पठान फिरोज खान (22, रा. नवीन घरकुल मूर्तिजापूर) याला विकल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार चौघांनाही ताब्यात घेवून आरोपीतांकडून एकूण नऊ मोटारसायकली (किंमत अंदाजे चार लाख 50 हजार) जप्त करण्यात आल्यात.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande