पंतप्रधान मोदींनी घेतली पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल यांची भेट
पोर्ट मोरेस्बी, 22 मे (हिं.स.) : हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेच्य
पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे


पोर्ट मोरेस्बी, 22 मे (हिं.स.) : हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे यांची पोर्ट मोरेस्बी येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

प्रथमच पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचे गव्हर्नर-जनरल यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व आणि विकास भागीदारी यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच हे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande