पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक
पोर्ट मोरेस्बी, 22 मे (हिं.स.) : हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्या शिखर परिषदे
पंतप्रधान मोदी न्यूझीलंड पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स


पोर्ट मोरेस्बी, 22 मे (हिं.स.) : हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे रोजी पोर्ट मोरेस्बी येथे, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांची भेट घेतली. हा या दोन्ही पंतप्रधानांमधील पहिलाच संवाद होता.

उभय नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांवर चर्चा केली तसेच व्यापार आणि वाणिज्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, संस्कृती, क्रीडा आणि परस्पर लोक हितसंबंध यासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande