रत्नागिरीत २८ मे रोजी राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट
रत्नागिरी, 23 मे, (हिं. स.) : रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने येत्या २८ मे रोज
रत्नागिरीत २८ मे रोजी राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट


रत्नागिरी, 23 मे, (हिं. स.) : रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने येत्या २८ मे रोजी रत्नागिरी फिशर्स क्लबतर्फे राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यातून रत्नागिरीत प्रथमच ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट आयोजित केली आहे. निसर्गसुंदर भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. हळूहळू गर्दीसुद्धा वाढत आहे. हेच औचित्य साधून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रत्नागिरीतील पर्यटन वाढण्याच्या ही टुर्नामेंट होणार आहे. स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहील. सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५०,०००, ३०,००० आणि २०,००० रुपये, रॉड, रीळ आणि फिशिंगसंदर्भातील अन्य वस्तू देण्यात येतील. याव्यतिरिक्त इतर खास पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक अँगलर्सला २००० रुपयांचे वेलकम किट आणि आकर्षक ग्रुप टीशर्ट, ग्रुप कॅप, चहा-नाष्टा, व्हेज- नॉन व्हेज जेवण, कोल्ड्रिंक्स आणि संध्याकाळचा चहा इत्यादी सुविधा पुरविल्या जातील. स्पर्धा १०० लोकांसाठी आयोजित केली आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

रत्नागिरीत राष्ट्रीय स्तरावरील पहिलीच स्पर्धा होत आहे. रत्नागिरीतील पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष सावंत (9405595805), केतन भोंगले (7875747411) किंवा आसिफ भाई (9663070613) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande