आश्विनी दासरी हिची खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर, 24 मे (हिं.स.):- लखनौच्या बाबू बनारसीदास विद्यापीठात होणाऱ्या ३ री खेलो इंडिया विद्यापीठ स्
आश्विनी दासरी हिची खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड


अहमदनगर, 24 मे (हिं.स.):- लखनौच्या बाबू बनारसीदास विद्यापीठात होणाऱ्या ३ री खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी अहमदनगर मल्लखांब व योगा सेंटर ची अश्विनी दासरी हिची निवड झाली आहे.उत्तरप्रदेश मधील राजा महेंद्र प्रताप सिंग राज्य विश्वविद्यालय अलिगढ येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेमधून तिची निवड झाली आहे.अश्विनी दासरी हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संघातून निवड झाली आहे.अश्विनी ही अहमदनगर मल्लखांब व योगा सेंटर येथे ६ वर्षांपासून मल्लखांबाचा सराव करते.तिला प्रशिक्षक अनिकेत सूसरे,प्राजक्ता दळवी,सुजाता सब्बन,शुभम शिंगटे,चंद्रशेखर चवंडके यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande