अमरावती : आईने दिले पोटच्या मुलीला विष
अमरावती, 24 मे (हिं.स.) चक्क आईने दुधातून दिलेले विष विश्वासाने पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा उपचारा
अमरावती : आईने दिले पोटच्या मुलीला विष


अमरावती, 24 मे (हिं.स.) चक्क आईने दुधातून दिलेले विष विश्वासाने पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ मे रोजी मृत्यूशी सुरू झालेली तिची झुंज १९ मे रोजी सायंकाळी नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये संपुष्टात आली. चिमुकलीच्या मृत्युनंतर तिला दुधातून विष देणाऱ्या तिच्या आईविरूद्ध कुऱ्हा पोलिसांनी २३ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास खून, खुनाचा प्रयत्न तथा आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.मुलांचा बाप असताना आपल्यानंतर कोण, असा विचार करून मुलांना विष पाजणाऱ्या प्रिया हिच्याबाबत समाजात माता न तू वैरिणी’ अशी प्रतिक्रिया उमटली आहे. अक्षरा अमोल जयसिंगकार (११, रा. अंजनसिंगी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आपल्याला पोटाचा त्रास असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होणार, या भीतीपोटी आपण अक्षरा व लहानग्या मुलाला बोर्नव्हिटा टाकलेल्या दुधात विष कालवले होते. ते विषयुक्त दुध दोन्ही मुलांना देऊन स्वत: देखील घेतल्याची कबुली अक्षराची आई प्रिया अमोल जयसिंगकार (२८, रा. अंजनसिंगी) हिने कुऱ्हा पोलिसांना दिली आहे. ११ मे रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास अंजनसिंगी येथे ती धक्कादायक घटना घडली होती. घटनेवेळी चिमुकल्यांचे वडिल अमोल जयसिंगकार हे कामासाठी घराबाहेर गेले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande