प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा आयसीयूत दाखल, ७२ तास क्रिटिकल
लखनऊ, २५ मे (हिं.स.) : प्रसिद्ध शायर (कवी) मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली असून त्यांना लखनऊ येथी
मुनव्वर राणा 


लखनऊ, २५ मे (हिं.स.) : प्रसिद्ध शायर (कवी) मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली असून त्यांना लखनऊ येथील अपोलो रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

त्यांची मुलगी समाजवादी पार्टीच्या नेत्या सुमैया राणा यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. सुमैया राणाने लिहिले, 'वडील मुनव्वर राणा यांनी तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यामुळे त्यांना लखनऊच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. जीवघेण्या आजारांशी लढा देत आयसीयूमध्ये मुनवर राणा. वडिलांसाठी प्रार्थना करा...'

गॉल ब्लॅडरमध्ये अडचणी

सुमैया राणा यांनी सांगितले की, दोन ते तीन दिवसांपासून वडिलांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यांना डायलिसिसवेळी पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचा सिटिस्कॅन आला असून त्यांच्या गॉल ब्लॅडरमध्ये काही अडचणी दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची सर्जरीही करण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर झालं असून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडिलांसाठी डॉक्टरांनी पुढचे ७२ तास क्रिटिकल असल्याचं सांगितलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

वर्षभरापासून आजारी

मुनव्वर राणा हे गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. गेल्या वर्षीही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. राणा यांना किडनीचा आजार असल्याने त्यांचे डायलिसीस केले जायचे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande