मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील- अमित शहा
दिसपूर, 25 मे (हिं.स.) : आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तस
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील- अमित शहा


दिसपूर, 25 मे (हिं.स.) : आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच भाजप तीनशेहून अधिक जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आसाममध्ये आयोजित सभेत शाह बोलत होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आगामी 2024 मध्ये 300 जागांसह नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. यापूर्वी देखील आसाममध्येच भाजपच्या दिब्रूगढ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी याचा पहिल्यांदा उच्चार केला होता. लोकसभेला आसाममधून भाजप 12 ते 14 जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला होता. ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे. यामुळेच ईशान्येचा विकास झाला असल्याचेही शाह यांनी सांगितले होते. एकेकाळी ईशान्य भारत हा काँग्रेसचा गड मानला जात होता. राहुल गांधींनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर ईशान्य भारतात निवडणुका आल्या, त्यानंतर काँग्रेसचा इथून सुपडा साफ झाला. आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. राहुल गांधी परदेशात जातात तिथे जाऊन देशावर टीका करतात, अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीकाही केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande