प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन
* नामांकन ऑनलाइन पद्धतीने https://awards.gov.in या पोर्टलवर 31 जुलैपर्यंत स्वीकारणार नवी दिल्ली, 25
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार


* नामांकन ऑनलाइन पद्धतीने https://awards.gov.in या पोर्टलवर 31 जुलैपर्यंत स्वीकारणार

नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती, नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना दरवर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) देऊन गौरव केला जातो. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 1,00,000/-, पदक, प्रमाणपत्र इ. असे असून दरवर्षी जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण केले जाते.

भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात वास्तव्य करणा-या वय वर्ष 18 च्या आतील(अर्ज/नामांकन प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत) मुला-मुलींना या पुरस्कारासाठी अर्ज करता येतात. ‘पीएमआरबीपी’साठीचे अर्ज फक्त https://awards.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त होणार आहेत. हे पोर्टल या उद्देशासाठी तयार करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31.07.2023 आहे.

संबंधितांचे अर्ज 31.07.2023 पर्यंत https://awards.gov.in या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने नामांकन स्वीकारले जातील.

या पुरस्काराविषयी तपशीलवार माहिती, मार्गदर्शक तत्त्वे पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे :

https://wcd.nic.in/sites/default/files/PMRBP Guidelines.pdf

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande