शाश्वत उत्पन्नासाठी संपूर्ण अनुदानावर फळबाग योजना
शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्य
शाश्वत उत्पन्नासाठी संपूर्ण अनुदानावर फळबाग योजना


शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात फळबागाचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषि विभागातर्फे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी ही योजना राबविण्यात येते. रोहयोतून प्रामुख्याने शेत आणि बांधावर फळझाडे लागवड करण्यात येते. यात शंभर टक्के अनुदान देण्यात येते. ही योजना कृषि, ग्राम विकास आणि वनविभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यात दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ देण्यात येतो.ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषी विभागामार्फत देण्यात येते. फळबाग, वृक्ष, फुलझाडे या योजनेत लागवड केली जाते. निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिकेमधून जातीवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच फळबाग लागवडीचे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.

या योजनेसाठी पात्र लाभार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, भूसुधारक योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006नुसार पात्र व्यक्ती, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार लहान शेतकरी एक हेक्टरपेक्षा जास्त परंतू दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले जमीन मालक व कूळ, सीमांत शेतकरी, सीमांत शेतकरी हे एक हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक व कूळ. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक 1 ते 11 प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतो.

या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर कधीही अर्ज करता येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सातबारा, 8अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉब कार्ड, दारिद्र्य रेषेखालील अल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे सादर करावी लागतात. योजनेत समाविष्ट फळपिके, वृक्ष, फुलपिके ही 59 प्रकारची फळपिके, वृक्ष, फुल पिके, मसाला पिके औषधी वनस्पती आदींसाठी सहाय्य केले जाते.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फळझाडाची लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजिकच्या ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

गजानन कोटुरवार,

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande