अश्विनीच्या अनुपस्थितीत शिल्पी मयुरीला दुखावण्यात यशस्वी होईल का ?
मुंबई, 25 मे (हिं.स.) : झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे.
शिल्पी


मुंबई, 25 मे (हिं.स.) : झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं वळवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनीला काही कारणासाठी कुहू सोबत बाहेरगावी जावं लागतं आणि त्याचा फायदा इकडे मयुरी आणि प्रतीक घेत आहेत कारण त्या दोघांमध्ये प्रेम फुलताना दिसतंय. पण यातच प्रेक्षकांना एक धक्का बसणार आहे, जेव्हा त्यांना कळेल की शिल्पीनेच प्रतीक ला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्लॅन केलंय. पण प्रतीक आता खरंच मयुरीच्या प्रेमात पडलाय. यातच शिल्पी मयुरीला ब्लॅक मेल करायला सुरुवात करते. कारण अश्विनी च्या अनुपस्थितीत शिल्पीला मयुरीला त्रास देऊन अश्विनी ला शिक्षा करायची आहे. शिल्पी या सगळ्यामध्ये यशस्वी होणार का ? की अश्विनी शिल्पीचा डाव तिच्यावरच उलटवेल? या सर्व उत्तरांसाठी पाहायला विसरू नका 'तू चाल पुढं' सोमवार ते शनिवार संध्या. ७:00 वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande