अकोला:सीबीलची अट रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
अकोला, 25 मे(हिं.स.) : सीबीलची अट रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आज शेतकरी जागर मंचच्या वतीने काढण्यात
ph


अकोला, 25 मे(हिं.स.) : सीबीलची अट रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आज शेतकरी जागर मंचच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी सहभागी होता. दरम्यान 13 मे रोजी झालेल्या खरीप हंगाम बैठकीत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबील अट लावणाऱ्या बॅंक विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही बँकांकडून सीबील अट लावली जात असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचाने करत आज अकोल्यातील बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सर्वसाधारणपणे सध्याच्या बँकिंग प्रणालीमध्ये कर्जासाठी पात्र होण्याकरिता 900 पैकी किमान 720 गुण मिळणे गरजेचे आहेय..गुणांकन 720 पेक्षा कमी असल्यास त्याला कर्ज मिळत नाही.. रिझर्व बँकेने सुरू केलेली ही अट शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी असल्याचं आरोप शेतकरी जागर मंचाने केला आहेय..शेतकरी विरोधात हे धोरण असल्याचं आरोप करीत अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता..'' सीबील '' च्या नावाने शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवण्याचा कट सरकार करत असल्याचा ही आरोप यावेळी करण्यात आला.. सीबिलच्या या जाचक अटी रद्द करण्याचा मागणीसाठी शेतकरी जागर मंच तर्फे अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande