ठाण्यात रंगणार धनगर रत्न पुरस्कार सोहळा
ठाणे, 26 मे (हिं.स.) : धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने
ठाण्यात रंगणार धनगर रत्न पुरस्कार सोहळा


ठाणे, 26 मे (हिं.स.) : धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने रविवार २८ मे रोजी धनगररत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार अभिजित शिंदे ( क्रीडा), डॉ वर्षा चौरे ( वैद्यकीय),सुनील कुराडे ( शासकीय),उत्तम यमगर ( उद्योजक),संजय वाघमोडे ( सामाजिक ),संदीप माने व सौ वर्षा माने (राजकीय), अमोल पांढरे (पत्रकारिता), विकास लांबोरे (लेखक-साहित्यिक), डॉ. आनंद दडस (शैक्षणिक ),पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ, मुंबई (सामाजिक संस्था) यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, गिर्यारोहक लहू उघाडे,इतिहास संशोधक सुमित लोखंडे व साहसी खेळाडू पंडित धायगुडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे रविवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला खासदार राजन विचारे,डॉ श्रीकांत शिंदे,आमदार संजय केळकर,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,निरंजन डावखरे,रवींद्र फाटक,शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के,माजी महापौर मीनाक्षी शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर,शिवसेना जत संपर्कप्रमुख,माजी नगरसेवक योगेश जानकर,माजी नगरसेविका विशाखा खताळ,पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास होनमाने,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

धनगर समाजासाठी धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले १२ वर्ष संस्था काम करत असून गेले ८ वर्षांपासून धनगर रत्न पुरस्कार सोहळा आयोजित करत आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला धनगर समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे व महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर यांनी केले आहे

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande