जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची गरज - रामदास आठवले
* संयुक्त राष्ट्रसंघातर्फे बँकॉक येथे बुध्दपोर्णिमा उत्सवास प्रारंभ बॅंकाॅक, 1 जून (हिं.स.) : सम्रा
Ramdas athwale


* संयुक्त राष्ट्रसंघातर्फे बँकॉक येथे बुध्दपोर्णिमा उत्सवास प्रारंभ

बॅंकाॅक, 1 जून (हिं.स.) : सम्राट अशोक युध्द करीत राहिले असते तर शांतीचा संदेश दिला गेला नसता, जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची गरज आहे. हिंसेने हिंसा वाढत जाते, अहिंसेमुळे शांती, प्रेम, मानवता वाढत राहते. त्यामुळे सम्राट अशोक युध्दाकडुन बुध्दाकडे वळले. बुध्दांचा शांतीचा विचारच जगाला तारणारा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

संयुक्त राष्ट्र संघ (युनो) थायलंड मधील बँकॉकच्या युनोच्या सेंटरमध्ये बुध्दपोर्णिमा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बँकॉक येथील महाचिलाँग कॉर्न राजा युनिव्हर्सिटी येथील सभागृहात या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बौध्द धम्म परिषदेला प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहिले आहेत. त्यांच्या समवेत युनायटेड बौध्द धम्म फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, बहुजन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, भिमराव सावतकर, नितीन गजभिये हे प्रतिनिधी भारतामधुन बौध्द धम्मपरिषदेला उपस्थित राहिले आहेत.

सद्या रशिया आणि युक्रेन यांचे युध्द सुरु आहे. युध्दामुळे जगाचे नुकसान होत आहे. युध्दामुळे कोणाचेही कल्याण होणार नाही. बौध्द धम्मामुळेच जगाचे कल्याण होणार आहे. जगाने युध्दाचा नाही तर बुध्दाचा विचार करावा. जगात उद्भभवणा-या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी भगवान बुध्दांनी दिलेल्या शांती, अहिंसा या तत्वांचा पुरस्कार करावा. या विचाराने आपण आंतरराष्ट्रीय बौध्द धम्मपरिषदेला उपस्थित राहिलो असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande