पवित्र गंगा नदीच्या दिव्य उगमाच्या स्मरणार्थ प्रतीक - नेहा जोशी
मुंबई, 03 जून, (हिं.स.) : गंगा नदी अत्यंत पवित्र आहे, प्रत्येक भारतीयाच्या मनात गंगा नदीला मोठे स्था
नेहा जोशी


मुंबई, 03 जून, (हिं.स.) : गंगा नदी अत्यंत पवित्र आहे, प्रत्येक भारतीयाच्या मनात गंगा नदीला मोठे स्थान आहे. भक्त समृद्धतेसाठी या पवित्र नदीचा आशीर्वाद घेतात. गंगा दसऱ्यादरम्यान गंगा नदीच्या काठावर अनेक दिवे प्रज्वलित केले जातात, ज्यामधून शांतता व परोपकाराचे आवाहन केले जाते. गंगा नदी वाहणाऱ्या विविध राज्यांमध्ये हा सण उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. याप्रसंगी एण्ड टीव्ही कलाकार नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’) या सणाचे महत्त्व आणि संबंधित प्रथांबाबत सांगत आहेत.

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘गंगावतरण म्हणून संबोधला जाणारा गंगा दसरा सण स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या पवित्र गंगा नदीच्या दिव्य उगमाच्या स्मरणार्थ प्रतीक आहे. हा सण उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व उत्तराखंड अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भक्त गंगा नदीच्या काठी एकत्र येऊन पवित्र विधीमध्ये सामील होतात आणि पवित्र नदीची आरती करतात. या शुभदिनी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आत्मा शुद्ध होते आणि शारीरिक आजारांचे निर्मूलन होते असे मानले जाते. नुकतेच, मी एका परफॉर्मन्ससाठी ऋषिकेशला गेले होते, जेथे गंगा नदीच्या मनमोहक सौंदर्याने माझे लक्ष वेधून घेतले. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मी पहिल्यांदाच अद्भुत गंगा आरती, प्रज्वलित करण्यात आलेला दिवा आणि तो दिवसा पवित्र नदीला अर्पण करण्याच्या क्षणाचा अनुभव घेतला. हरिद्वार व ऋषिकेश अशा पवित्र शहरांमध्ये शूटिंग करताना मला खूप आनंद मिळाला. अनेक स्थानिकांनी हा उत्सव ज्या भव्यतेने तेथे साजरा केला जातो त्याच्या कथा सांगितल्या. पुन्हा एकदा या ठिकाणांना याच कालावधीदरम्यान भेट देण्याची, उत्साहवर्धक उत्सवाचा आनंद घेण्याची आणि सेलिब्रेशनच्या खऱ्या साराला अनुभवण्याची माझी इच्छा आहे.’’

मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ‘‘गंगा दसरा सण दहा पवित्र वेदिक पैलूंच्या सेलिब्रेशनला साजरा करतो, जे विचार, शब्द व कृत्यांशी संबंधित दहा अपराधांना शुद्ध करण्याच्या गंगा नदीच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. माझी आई नेहमी सांगायची की, भक्त मुक्तीचा शोध घेताना सांत्वनाचा देखील शोध घेतात. उत्तर प्रदेशमधून असल्यामुळे मला मानवी अस्तित्वामधील गंगा नदीचे महत्त्व आणि आध्यात्मिक जागरूकता माहित आहे. भव्य हिमालयातील गंगोत्रीच्या बर्फाच्छादित शिखरांवरून उगम पावलेली ही नदी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारांमधून बंगालच्या उपसागरात विलीन होईपर्यंत वाहते. अलाहाबादमधील गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम प्रयाग म्हणून ओळखले जाते, हे अतुलनीय श्रद्धेचे पवित्र स्थान आहे. सायंकाळच्या वेळी नदीकिनारी दीप व फुलांनी सजलेल्या रोषणाईच्या पानांच्या बोटींसह भव्य आरती सोहळा पाहणे एक विलक्षण अनुभव आहे. या पवित्र नदीच्या शाश्वत सौंदर्याला सादर करणारी ही खरोखरंच आनंददायी भेट आहे.’’

मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘‘भक्त चांगल्या भविष्यासाठी पवित्र गंगा नदीचा आशीर्वाद घेतात. बालपणी मी गंगा नदीच्या काळी खेळायची आणि सणादरम्यान नदीच्या वाहत्या पाण्यावर प्रज्वलित केलेल्या अनेक दिव्यांचे विलोभनीय दृश्य पाहिले आहे. ही सुरेख प्रथा शांतता व चांगलेपणाचा शोध घेण्याचे प्रतीक आहे. वर्षातील या काळादरम्यान जगभरातील लोक वाराणसीमध्ये येऊन पवित्र नदीमध्ये पवित्र स्नान करतात. तसेच माझ्या आईने विश्वासाने दहाच्या पटीत अर्पण करण्याची परंपरा पाळली आहे. दहा विविध प्रकारची फुले, सुगंध, दिवे, अर्पण, सुपारीची पाने किंवा फळे असोत, तिने दहा आकड्याच्या महत्त्वावर भर दिला. गंगा नदीमध्ये स्नान करताना दहा वेळा डुबकी घेण्याची प्रथा आहे. आमच्या कुटुंबामध्ये मौल्यवान संपत्ती मिळविण्यासाठी, नवीन वाहने खरेदी करण्यासाठी किंवा नवीन घरात प्रवेश करण्यासाठी या शुभ दिवसाला खूप महत्त्व आहे. मी यंदा शहरामध्ये उपस्थित राहून या सणाचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यास उत्सुक आहे.’’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande