जी 20 गटाची तिसरी रोजगार कार्य गटाची बैठक जिनेव्हा येथे संपन्न
* सर्व सदस्यांमध्ये मसुद्यावरील मंत्रिस्तरीय संवाद आणि प्राधान्य क्षेत्राशी संबंधित फलनिष्पत्ती दस्त
G20 Geneva meeting


* सर्व सदस्यांमध्ये मसुद्यावरील मंत्रिस्तरीय संवाद आणि प्राधान्य क्षेत्राशी संबंधित फलनिष्पत्ती दस्तऐवजांवर व्यापक मतैक्य

जिनेव्हा, 3 जून (हिं.स.) : भारतीय अध्यक्षतेखालील जी 20 कार्यकाळातील 3 री रोजगार कार्य गटाची (EWG) बैठक आज जिनेव्हा येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. 31 मे ते 2 जून या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मुख्यालयात झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत जी 20 सदस्य देश, आमंत्रित देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या 78 प्रतिनिधी सहभागी झाले.

ही बैठक जी 20 रोजगार कार्य गट 2023 च्या प्राधान्य क्षेत्राशी संबंधित फलनिष्पत्ती दस्तावेज आणि मंत्रीस्तरीय मसुद्यावरील सर्व सदस्यांच्या व्यापक मतैक्यासह सकारात्मक वातावरणात संपली.

जी 20 च्या रोजगार कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीने भारतीय अध्यक्षतेखाली रोजगार कार्य गट 2023 साठी 03 प्रमुख प्राधान्य क्षेत्रांच्या परिणामांवर एकमत निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा पार केला. तिसर्या बैठकीचा समारोप अध्यक्षांच्या आभारप्रदर्शनाने झाला, जिथे ही बैठक यशस्वीपणे आयोजित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व भागधारकांचे विशेषत: आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयातील भारताचे कायमस्वरूपी मिशन यांचा अध्यक्षांनी आपल्या आभारप्रदर्शनात विशेष उल्लेख केला. रोजगार कार्य गटाची तसेच कामगार आणि रोजगार मंत्र्यांची चौथी आणि शेवटची बैठक 19 ते 21 जुलै 2023 दरम्यान भारतात इंदूर येथे होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande