महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाणांसाठी तेलंगणात धाव
अमरावती, 3 जून (हिं.स.) राज्यातील शेतकरी नवनवीन विविध कंपनीचे कापूस, मिरची व इतर बियाणे खरेदीसाठी ते
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाणांसाठी तेलंगणात धाव


अमरावती, 3 जून (हिं.स.) राज्यातील शेतकरी नवनवीन विविध कंपनीचे कापूस, मिरची व इतर बियाणे खरेदीसाठी तेलंगणा राज्यात जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

राज्यातील अमरावती सह चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांना तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. तसेच या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील शहरात मोठ्या कृषी बाजारपेठा आहेत. दोन्ही राज्यांच्या करप्रणालीत असल्याने राज्यात उपलब्ध असलेल्या बियाणांच्या दरात आणि तेलंगणा राज्यात उपलब्ध असलेल्या बियाणांच्या दरात बरीच तफावत आहे. त्यामुळे कमी किमतीत बियाणे उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग तेलंगणा राज्यातील कृषी बाजारपेठांकडे वळला गेला.

राज्यालगत असलेल्या सीमावर्ती भागात राज्याप्रमाणेच कापूस, मिरची आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच स्थानिक वाणांपेक्षा नवनवीन संकरित वाणांना शेतकरी यंदा पसंती देताना दिसत आहेत. बाहेरील काही वाण स्थानिक वाणांपेक्षा उच्च उतारा देत असल्याने शेतकरी वर्ग तिकडे आकृष्ट झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची गर्दी स्थानिक बाजारपेठेपेक्षा

परराज्यातील बाजारपेठेत अधिक दिसून येत आहे. आताच महागडे बियाणे घेतल्यास पुढील हंगाम कसा चालवायचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे कमी किमतीत जाण्या-येण्याचा खर्च निघून परवडणारे बियाणे शेतकरी तेथे जाऊन घेत आहेत. यामुळे तेलंगणा राज्यातील कृषी बाजारपेठांचे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून हा कित्ता शेतकरी दरवर्षी गिरवताना दिसतात. या कारणाने स्थानिक बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. मात्र, परराज्यातील बियाणे खरेदी दरम्यान बरेचदा बोगस बियाणे येत असल्याने फसगतीचे प्रकार होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावधान होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande