वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या आंतरराष्ट्रीय ऑननरी उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची निवड
बँकॉक/मुंबई, 3 जून (हिं.स.) - वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या या आंतरराष्ट्रीय अत्यंत महत्वपुर्ण बौध
Ramdas Athawale


बँकॉक/मुंबई, 3 जून (हिं.स.) - वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या या आंतरराष्ट्रीय अत्यंत महत्वपुर्ण बौध्द संघटनेच्या ऑननरी उपाध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत आज बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिपचे अध्यक्ष फॅलाप थेरी यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या आंतरराष्ट्रीय ऑननरी उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची निवड करीत असल्याचे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत येत्या फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची परिषद आयोजित करण्याबाबत तसेच वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची आंतरराष्ट्रीय मुख्य धम्म परिषद आगामी 2027 मध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्याचा प्रस्ताव रामदास आठवले यांना वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टचे अध्यक्ष फॅलाप थेरी यांनी दिला. हे दोन्ही प्रस्ताव रामदास आठवले यांनी स्विकारले असुन आगामी 2023 मध्ये मुंबईत वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची परिषद घेण्यात येणार आहे. 2027 मध्ये नवी दिल्लीत वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजीत केली जाणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

यावेळी वर्ल्ड फेलोशिप ऑफ युथ बुध्दिस्टचे अध्यक्ष आयडेंट थेरी तसेच मुळचे नागपुरचे असणारे मात्र गेल्या 20 वर्षापासुन थायलँड बँकॉकमध्ये राहणारे उद्योजक राज वासनिक तसेच युनायटेड बुध्दीस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे ;काजल शेवाळे; विशाल शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट या जागतिक बौध्द संघटनेला बौध्द जगतामध्ये फार महत्व आहे. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची सन 1950 मध्ये श्रीलंका येथे स्थापना झाली. बोधीसत्व महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या संस्थापकापैकी एक संस्थापक आहेत. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या भुतान, श्रीलंका या देशातील परिषदेला महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते. त्यामुळे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टला आंतरराष्ट्रीय महत्व आहे. त्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या उपाध्यक्षदी यापुर्वी रामदास आठवले यांनी काम केले आहे. त्यांच्यापुर्वी रा.सु. गवई यांनीही वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षपद भुषविले आहे.

रामदास आठवले यापूर्वी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टचे यापूर्वी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले असुन त्यांनी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या अनेक संमेलन, धम्मपरिषद बैठकींना उपस्थिती नोंदविली आहे. त्यामुळे रामदास आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या आंतरराष्ट्रीय ऑननरी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टचे 55 देशामध्ये कामकाज चालू आहे. रामदास आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टच्या आंतरराष्ट्रीय ऑननरी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच भारतीय बौद्ध आणि आंबेडकरी जनतेत आनंदाची भावना आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande