लाचखोर अधिकारी धनगर यांच्याकडे सापडले ८५ लाख रुपये रोख, ४५ तोळे सोने
नाशिक , ०३ जून (हिं.स.) - नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे 85 लाख रुप
लाचखोर अधिकारी धनगर यांच्याकडे सापडले ८५ लाख रुपये रोख, ४५ तोळे सोने


नाशिक , ०३ जून (हिं.स.) - नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे 85 लाख रुपये रोख पंचेचाळीस आणि प्लॉट व फ्लॅट असे सापडले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा घाडगे - वालावलकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. असं सांगून त्यांनी माहिती देताना सांगितले की, लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची शुक्रवारी झडती घेतली असून त्यांचा घरात तब्बल 85 लाखांची रोकड व 45 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच दोन फ्लॅट आणि एक प्लाट असे संपत्ती सापडली असून त्यांचं राहतं घर देखील सील करण्यात आला आहे त्यांच्या बँक खात्याची चौकशी सुरू असून त्यामध्ये अजून काही सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande