ओडिशा : सिग्नलशी संबंधीत बिघाडामुळे झाली रेल्वे दुर्घटना
अपघाताच्या प्राथमिक तपासात पुढे आली माहिती बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे शुक्रव
सिग्नलशी संबंधीत बिघाडामुळे झाली रेल्वे दुर्घटना


अपघाताच्या प्राथमिक तपासात पुढे आली माहिती

बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 3 रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघात झाला. यामध्ये 288 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून 855 लोक जखमी झालेत. या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल पुढे आलाय. त्यानुसार सिग्नलशी संबंधीत बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय.

या अपघातासंदर्भातील माहितीनुसार शुक्रवारी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये मालगाडी उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी 12841-कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा 2 लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते.बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती. बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे 2 डबे रुळावरून घसरलेल्या ते कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळे मोठा अपघात झाला आहे.

चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन येथून दुपारी 3.20 वाजता सुटते. ट्रेन ओडिशाच्या बालासोर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 6.30 वाजता पोहोचते, जिथे ती फक्त 5 मिनिटे थांबते. ट्रेन बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनजवळ संध्याकाळी 6.55 वाजता पोहोचली. त्यावेळी मालगाडीवर धडकली. त्यावेळी संध्याकाळी 7 वाजता पलीकडून बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाणार होती. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे बंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या रुळांवरून घसरले. त्यामुळे बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस या डब्यांना धडकली. या धडकेमुळे बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे 3 डबे पूर्णपणे रुळावरून घसरले.

रेल्वे तज्ज्ञांच्या मतानुसार या अपघाताची 2 कारणे आहेत. मानवी चूक आणि तंत्रज्ञानातील चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड हे मुख्य कारण असल्याचे अद्याप मानले जात आहे. अपघात झाला तेव्हा सिग्नलिंग यंत्रणा सक्रीय असती तर कोरोमंडल एक्स्प्रेस थांबवता आली असती.कारण, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. अशा स्थितीत अपघाताची माहितीही नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, ही माहिती नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ हा अपघात रोखण्यात मोठा घटक ठरू शकला असता असमत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande