रेल्वे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल- पंतप्रधान
बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 निरपराध
बालासोर येथे अपघातस्थळाची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी


बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 निरपराध नागरिकांचा बळी गेलाय. या गंभीर घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शनिवारी बालासोरला जाऊन तिथली पाहणी करून मदत आणि बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्या सर्वांना संपूर्ण बरे होईपर्यंत सरकारी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले, की बालासोर रेल्वे दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची पूर्ण दखल घेऊन भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेमका कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील?, याची पूर्ण चाचपणी केली आहे. या दुर्घटनेने सरकारला खूप काही शिकवले आहे. पण त्याचबरोबर या रेल्वे दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, कोणालाही जबाबदारीतून निसटून जाता येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande